MCGM permission to build in-house toilets under Swach Maharashtra Scheme

Efforts pay for Sankalp Siddhi Trust as MCGM recognises the work done by us for “Devachi wadi , Versova, Andheri west “, residents to get MCGM permission & Rs 5000/- each construction cost to “60 households” for building in-house toilets under Swach Maharashtra Scheme (Urban). This helps to reduce open defecation on versova beach seaside in big way.

संकल्प सिद्धी ट्रस्ट च्या प्रयत्नांना यश !!!

वर्सोवा , अंधेरी पश्चिम येथिल समुद्र किनाऱ्या जवळील "देवाची वाडी " ह्या वस्ती मध्ये वास्तव्यास असणाऱ्या ६० घरानं मध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत आता शौचालय होणार. राज्यातील शहरी भागामधील उघड्यावर सौच करण्याची प्रथा बंद करून शहरे हंगंदारी मुक्त कारण्यासंदर्भात काम चालू आहे. ह्या अभिनयाअंतर्गत मुंबई महानगर पालिका जनजागृती करून शौचालय नसलेल्या वस्तींमध्ये वैयक्तिक घरगुती शौचालय बांधण्याकरिता परवानगी व रु ५०००/- आर्थिक मद्दत योजने अंतर्गत देत आहे.

संकल्प सिद्धी ट्रस्ट कडे वर्सोवा अंधेरी पश्चिम "देवाची वाडी " येथील रहिवासी माझ्या कडे ह्या सरकारी योजने बाबत माहिती घेण्यास ऑगस्ट २०१७ मध्ये आले होते . त्यांच्याशी बोलल्यावर समझला की गेल्या ७० वर्षा पासून हे रहिवाशी वर्सोवा समुद्र किनाऱ्या लागत बैठया चाळीं मध्ये राहतात आणि त्याच्या घरात आजवर शौचालय बांधण्यास परवानगी मिळत नव्हती आणि जरी मिळाली तरी शौचालय घरात बांधालयवर त्याला सिवेर लाईन नी जोडून कोण देणार?

संकल्प सिद्धी ट्रस्ट - नागरिकांच्या सेवे साठी नेहेमीच तत्पर असते. देवाची वाडी येथील १०५ रहिवास्यांची यादी निवेदन पत्रा सहित मला देण्यात आली. प्रत्येक फॉर्म स्वच्छ भारत अभियान पोर्टल वर अर्जदाराच्या माहिती सहित भरला गेला आणि मग मुंबई महानगर पालिके सोबत संपर्क साधून SWM व Maintenance dept ला बोलावून देवाची वाडीतील १०५ घरांचं सर्वेक्षण ऑगस्ट २०१७ मध्ये करून घेतल गेला . सर्वेक्षण झाल्यावर ६० अर्जदारांना मुंबई महानगर पालिके (के पश्चिम वॉर्ड) कडून घरात सौचालाय बांधण्याची परवानगी प्राप्त झाली.

आज मुंबई महानगर पालिकेने संकल्प सिद्धी ट्रस्ट ला ह्या केलेल्या कामा साठी प्रशस्ती पत्र दिल्या बद्दल त्याचे मनापासून आभार 🙏🙏🙏