संकल्प सिध्दी ट्रस्टकडून वाद्य कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

कोरोनाच्या टाळेबंदीमध्ये लग्नकार्यामध्ये वाद्य कलाकारांच्या रोजगारावर विपरित परिणाम झाले. त्यामुळे कलाकारांच्या २५५ कुटुंबाना संपल्प सिध्दी ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने अंधेरी वर्सेवा गावात राहणाऱ्या कलाकारांना बुधवार,दि. ११ ऑगस्ट रोजी अत्यावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. राज्य सरकारने कलाकारांना काम त्यांचा व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी परंतू सरकार त्यांना परवानगी कधी देईल माहिती नाही पण संपल्प सिध्दी ट्रस्ट ने सर्व कुटुंबाना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. असे संकल्प सिध्दी ट्रस्टच्या कार्यकारी विश्वस्त दिव्या ढोले यांनी सांगितले.